Thursday, October 6, 2011

रंग माझा वेगळा..!

रंग माझा वेगळा..!
आज दसरा..मला आज माझा ब्लॉग सुरु करताना खरंच खूप आनंद होत आहे..खूप दिवसांपासून मनात असूनही न घडलेली गोष्ट आज प्रत्यक्षात येत असल्याने मला बरं वाटतंय.
अनेक वेळा अनेक विचार मनात येतात तेंव्हा ते लगेच कुठेतरी लिहून ठेवावेसे वाटतात,पण नेमकं त्याच वेळी पेन पेपर मिळत नाही ...म्हणजे ते समोर असले तरी उगीच लिहिण्याचा आळस येतो!
त्यामानाने हा मिळालेला पर्याय खरंच खूप सोप्पा आहे.

आपण सगळेच जण रोज काहीतरी नवनवीन अनुभवत असतो..नवनवीन पाहत असतो..फक्त प्रत्येकाची त्याकडे बघण्याची दृष्टी निराळी असते.
दुर्दैवाने काहीना वेगळ्या पद्धतीने बघण्याची दृष्टी स्वतःकडे आहे ह्याची जाणीव देखील नसते! ते दुसर्यांच्या दृष्टीला स्वतःची दृष्टी मानत जगत राहतात..

रंगून रंगात साऱ्या  रंग माझा वेगळा..
घरात, मित्र मैत्रीणमध्ये, नातेवाईकांच्या घोळक्यात कुठेही बोलायला लागल्यावर आपले विचार थोडेसे इतरांना वेगळे वाटतात..असं तुमच्या बाबतीत झालंय का?
ते सगळ्यांना सगळे पटतात असं होत नाही..आणि म्हणून आपले विचार बदलतात असंही काही नाही..असं तुमच्या बाबतीत तुम्ही वागता का?
एखाद्या घटनेकडे अत्यंत पारदर्शकपणे किंवा अतिशय त्रयस्थपणे पाहता आलं पाहिजे....आणि ती गोष्ट तितक्याच प्रामाणिक पणे कुणाच्याही समोर मांडताही आली पाहिजे...
माझे विचार हे माझे आहेत..ते इतरांना पटवेत म्हणून नव्हे तर ते मला पटतात म्हणून माझे आहेत हि भावना स्वतहून जपली तर त्यात हरकत काहीच नाही, नाही का?

माझ्या आजूबाजूला मी जेंव्हा चौफेर नजर टाकते तेंव्हा मात्र जी मानसं मला दिसतात ती त्यांच्या बरोबरच्यांना काय वाटते ह्या प्रमाणे आपलं मत ठरवताना दिसतात.
त्यांच्यातल्या रंगाला ते मोकळेपणाची छताच देत नाहीत.  आणि ते इतरांच्या रंगात सहज मिसळून जातात..
माझं हे असं स्वतःला खूप खूप प्रामाणिक राहणं आणि स्वतःच्या मताला ठाम राहणं मला खूप आवडतं आणि मनापासून पटतही...
म्हणूनच मला असा वाटतं..रंग माझा वेगळा..!

No comments:

Post a Comment